आंबा

आपल्या निसर्ग परिसरात अनेक
वेगवेगळे मोठे मोठे वृक्ष आहे; त्यांपैकी एक वृक्ष म्हणजे आंबा आहे. सदाहरित
असणारा हा आंबा वृक्ष आबालवृद्ध साऱ्यांनाच परिचित आहे.
वर्णन:-
निवांत, गार सावली देणारे डेरेदार झाड म्हणजे
आंब्याचे झाड होय. याची पाने गडद हिरव्या रंगाची, लांबट आकाराची असतात. हे झाड
साधारणपणे ३५ ते ४० फुट उंच असते. झाडाचे खोड खूप जाड व हिरव्या रंगाचे, भरपूर
फांद्या असलेले, विस्तीर्ण असते. या झाडाची साल जाड असते.
आंब्याच्या झाडाला साधारणतः फेब्रुवारीच्या
अखेरीस येणारा मोहोर म्हणजेच फुले होय. हि फुले छोटी छोटी असतात. साधारणपणे एप्रिल
महिन्यात फळे येतात. कच्च्या फळांना कैरी म्हणतात, ती फळे पिकल्यानंतर आंबे तयार
होतात.
लागवड:-
आंबा
ही वनस्पती राज्यात सर्वत्र आढळते. आंब्याच्या फळामध्ये एक कोय असते. ती लावली
असता आंब्याचे रोप उगवते. या रोपाची कोवळी पाने फारच कोवळी असतात. हि कोवळी पाने
सुंदर असतात. ती लालसर चोकलेटी रंगाची असतात. काही झाडाच्या रोपांना कलम पण केले
जाते. या कलम केलेल्या झाडांना लवकर फळे येतात.
वैशिष्ट्ये:-
आंब्याच्या झाडाला येणारा मोहोर प्रथम शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला
वाहण्याची प्रथा आहे.
जाती:-
आंब्याच्या शेकडो जातींपैकी हापूस, तोतापुरी, पायरी, रायवळ, लंगडा, दशहरी,
नीलम, माल्गोवा, देवगड, बदामी या प्रसिद्ध आहे.
धार्मिक महत्व:-
आंब्याच्या झाडाचे धार्मिक कार्यक्रमात फार मोठे महत्व आहे. घर – सजावट,
वास्तुशांती, लग्न समारंभ वैगरे धार्मिक कार्यांत आंब्याच्या पानांचे तोराण
वापरतात. आंबा हे फळ दशहार व जेष्ठ पौर्णिमेला देवापुढे ठेवतात, ब्राह्मणाला दान
देतात.
इतर उपयोग:-
कैरी आंबट – गोड, रुचकर लागते. कैरीचा उपयोग लोणचे, चटणी, पन्हे करण्यासाठी
करतात. तसेच उन्हाळ्यात अंगावर घामोळ्या आल्या तर कैरी शिजवून त्याचा गार अंगाला
लावून आंघोळ करतात. कैर्यांचा कीस अंगाला लावून अंघोळ करतात. कैर्यांचा कीस उन्हात
वळवून त्यात गुल किंवा साखर घालून सरबत करतात, कैर्या किसून त्यांचा मुरंबा किंवा
गुळांबा करतात. तो वर्षभर टिकतो.

औषधी उपयोग:-
आंबा हा औषधी वृक्ष आहे. रंजनवादी झाली असता त्यावर या झाडांच्या पानांचा
चीक लावतात. कैरीचे पन्हे प्यायल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही. आंबा खाल्यान्ने
अशक्तपणा, शारीरिक कमजोरी कमी होते.आंब्याच्या रसात मिरेपूड, साजूक तूप घालून
खावा. तसेच वाट्यातील गार काढून, त्याचे चूर्ण करून त्याचा उपयोग दंतरोगावर करतात.
अशा
बहु उपयोगी, स्वदिष्ट्य, रुचकर आंब्याला ‘फळांचा राजा’ असे म्हणतात. आंब्याची
पुष्कळ झाडे असलेल्या ठिकाणाला आमराई असे म्हणतात. आंबा उत्पादन हे अर्थार्जनाचे
एक उत्तम साधन आहे. या वृक्षाचे लाकूड तानक असल्याने त्याचा उपयोग शेतीची अवजारे,
फळ्या तयार करण्यासाठी होतो. आंब्याच्या झाडाचा उपयोग जळणासाठी लाकूड म्हणूनही
करतात.
