काजू
इंग्रजी नाव :- Cashew
आपल्या परिसरात अनेक मोठी झाडे
आहेत. त्यांपैकी एक म्हणजे काजूचे झाड होय. फळ झाडांमध्ये आंब्याच्या प्रकारापैकी
हापूस आंब्याच्या झाडाला फळांचा राजा असे म्हणतात, तसेच काजूच्या झाडाला ‘राणी’
असे संबोधतात. असे ऐकिवात आहे.

वर्णन :-
काजूच्या झाडाचे वर्णन आंब्याच्या
झाडाशी मिळते जुळते असते. या झाडाची पाने हिरवी असतात. वरून तांबूस रंगाचे आवरण व
आतमध्ये पांढर्या रंगाचे फळ असते. या झाडाला जी फुले येतात त्यालाच मोहोर असे
म्हणतात. या झाडाचे जे पांढरे फळ जे सुकामेवा खाण्यासाठी वापरतात. तेच काजू म्हणून
वापरतात.
लागवड :-
काजू या झाडाची लागवड करण्यासाठी
उष्ण व दमट हवामान असावे लागते. या झाडाला पावसाचे पाणी प्रामुख्याने सवे लागते.
विशेषकरून कोंकण, केरळ, तमिळ नाडू या ठिकाणी काजूचे उत्पादन केले जाते. जास्तीत
जास्त उत्पादन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतले जाते.
औषधी उपयोग:-
काजूच्या बिया पौष्टिक असल्याने
खाण्यासाठी वापरतात. काजुमध्ये ‘क’ जीवनसत्व असते. म्हणून त्याचा उपयोग आपल्या
आहारात केला जातो.
इतर उपयोग :-
शिरा, बर्फी, लाडू तसेच मिठाई मध्ये
काजूचा उपयोफ करतात. काजूची जेली, मुरंबा, चोकलेट वैगरे पदार्थ बनवतात.
इतर माहिती:-
काजूच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा
उपयोग होतो. या झाडाच्या लाकडापासून होड्या, टाईपरायटर, रोलर्स तयार करतात.
कलाकुसरीचे लाकूडकाम करताना या झाडाच्या लाकडाचा उपयोग करतात.
या झाडाच्या सालीपासून मिळणाऱ्या
रसाचा उपयोग शाई व रंग तयार करण्यासाठी करतात. काजूच्या फळावर जे तांबूस रंगाचे
टरफल असते ते कोम्बाद्यान्साठी पौष्टिक अन्न म्हणून वापरले जाते. या तर्फालाचा
उपयोग तेल काढण्यासाठीही होतो. या तेलाचा उपयोग कोळी लोक जाळ्यांना लावण्यासाठी व
बोतोच्या बाहेरील बाजूस लावण्यासाठी करतात.
अशा या बहुगुणी काजूच्या झाडाची
लागवड लोक शेतात करतात. त्यापासून त्यांना उत्पादन मिळते. हे एक अर्थाजानाचे झाड
आहे. पूर्ण वाढ झालेल्या प्रत्येक झाडापासून किमान ६० ते ६० किलो काजू मिळतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा