सुपारी
वर्णन : -
सुपारीचे झाड उंच वाढते. याला
फांद्या नसतात. खोड सरळ वाढते. साधारणतः तीस ते पस्तीस फुट वाढते. याच्या पानानंना
झावळ्या असे म्हणतात. त्या फक्त शेंड्याला असतात. खोडालाच फळे लागतात. याला फोफळी
किंवा सुपारी म्हणतात. ही फळे घडांनी लागतात. फळे कोवळी असताना हिरवी आणि
पिकल्यावर बदामी रंगाची दिसतात.
फळे पिकल्यावर वळवून सोलतात. याला
सोले काढणे म्हणतात. सोललेली सुपारी पंढरी असते व शिजल्यावर लालसर होते.

प्रकार :-
लाल सुपारी व पंढरी सुपारी असे
सुपारीचे दोन प्रकार पडतात.
धार्मिक महत्व :-
सत्यनारायण पूजा, होम- हवन,
वास्तुशांती, लग्न-समारंभ वैगरे पूजेच्या वेळी गणपतीची प्रतिमा म्हणून लाल
सुपारीची पूजा केली जाते. सवाष्ण बायकांची ओटी भरताना, त्याचप्रमाणे श्रध्द, पक्ष
करताना सुपारीचा वापर करतात.
इतर उपयोग :-
सुपारीचा उपयोग नुसती खाण्यासाठी
तसेच मसाला सुपारीसाठी करतात, कातरलेली सुपारी पावडर बाजारात विकत मिळते.
इतर माहिती :-
ही झाडे कोकण, गोवा, मद्रास, केरळ
या ठिकाणी भरपूर आढळतात. हे झाड चिवट असते. या झाडाच्या वाढीसाठी समुद्रकिनार
पट्टीचे उष्ण व दमट आणि खरे हवामान अनुकूल साते.
उपरी शिजवताना वर येणारा तवंग चिकट
असतो. होड्यांना वंगण म्हणून याचा वापर करतात. होड्यांना हा तवंग बाहेरून लावतात;
त्यामुके लाकडावर खर्या पाण्याचा परिणाम होत नाही.
अशी ही बहु उपयोगी स्परीची लागवड
समुद्रकिनार पट्टीवर केली जाते. तेथूनच सुपारीची निर्यात होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा