बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

पेरू

                      पेरू

      पेरूचे झाड सर्वत्र आढळते. याची फळे लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत साऱ्यांनाच खायला आवडतात.


जाती : पंधरा आणि तांबडा पेरू अशा याच्या दोन जाती आहेत.

वर्णन : हे झाड उंचीने लहान असते. याचे खोड एक वीतभर रुंद, पांढरट रंगाचे असते. खोडाचे पापुद्रे निघून, ते आपोआप गळतात. पाने हिरव्या रंगाची असून त्यावर शिरा असतात. हि पाने फांदीवर असतात. एका आड एक येतात. पानांना छोटेसे देठ असते.
याची फुले पंढरी असतात. फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची, तर पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. आतील गार पांढऱ्या किंवा गुलाबी लालसर रंगाचा असतो. हि फळे गोड किंवा अगोदाही असतात.

औषधी उपयोग : अजीर्ण, अग्निमान्ध्य व पोटदुखी यावर पेरूचा उपयोग होतो. पेरूमध्ये ‘बी’ व ‘सी’ व्
व्हिटामिन्स असतात. तोंडाचे चट्टे, दंत विकार, पोट्शुल असणार्यांनी पेरू खावा. पेरूमुळे रक्त वाढते. 

वैशिष्ट्य : या फळात  अगदी बारीक पांढर्या बिया असतात. या बियासहित सालीसहीत हे फळ खाल्ले जाते. व वरच्या सालीसहीत हे फळ खाल्ले जाते.

         

इतर माहिती : या झाडाचे खोड चिवट आणि बळकट असते. पेरूच्या झाडाला सतत पाणी द्यावे लागत नाही. हे फळ पोपटाला खूप आवडते. पेरू दिसले कि पोपटांचे थवेच्या थवे या झाडांकडे झेपावतात. हे थंड प्रकृतीचे फळ आहे. पेरूची कोशिंबीर आणि वड्या पण करतात. पेरू खाणे माणसाला प्रकुतीच्या दृष्टीने हितावह आहे. हि झाडे लावल्यापासून अडीच ते तीन वर्षांनी त्याला फळे येऊ लागतात.

या फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने  शेतकरी पेरूच्या बागा तयार करून उत्पादन काढत आहेत. तसेच दारासमोर अंगणातसुद्धा हि झाडे लावतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा