बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

खजूर

               खजूर

इंग्रजी नाव:- Date

प्रस्तावना:-
      आपल्या परिसरात अनेक प्रकारची झाडे असतात. आपण दररोज पौष्टिक फळे खात असतो. त्यांच्या बिया आपल्या परिसरात पडल्या, कि, त्यांची रोपे उगवतात. त्यांपाकी एक झाड म्हणजे खजूर होय.


वर्णन:-
    खजुराचे झाड थोडेफार नारळाच्या झाडाशी मिळतेजुळते असते. या झाडाची उंची सर्वसाधारणपणे ६० ते ७० फुट असते. या झाडाचे खोड उंच व सरळ वाढते. या झाच्या फक्त तोकाशीच फांद्यांचा झुपका असतो. तसेच खोडावर भरपूर खाचा असतात त्या गळून पडलेल्या पानांच्या बुडापासून झालेल्या असतात.
   या झाडाचे खोड मौ व पोकळ असते. या झाडाची पाने तानक व टोकाला अणकुचीदार असतात. तसेच ३ ते ४ फुट लांब असतात. या झाडाला येणारी ओळी फळे म्हणजे खजूर आणि कीच फळे वाळल्यानंतर त्याला खारीक असे म्हणतात.

लागवड:-
    खजुरांच्या झाडाची लागवड वालुकामय प्रदेशात केली जाते. तसेच वालुकामय प्रदेशात हा वृक्ष वाढणारा असला तरी ठराविक प्रदेशात व काही प्रमाणात पाणी दिल्यास जेथे लावेल तेथे वाढतो व फळे येतात.

वैशिष्ट्य:-
    नर व मादी अशा दोन जातींची झाडे येतात. त्यापैकी मादी जातीच्या झाडाला फळे येतात.

औषधी उपयोग :-
   खजुराचा उपयोग आयुर्वेदात केला जातो. तसेच पित्तनाशक, डोकेदुखी, मुलांची सर्दी, हिवताप, मुलावाधीवर खजुराचा उपयोग होतो.



इतर उपयोग:-
   उपवास असेल तेव्हा खजुराला फार मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच तान्ह्या मुलाला बल्गुती देताना खाराकेचा उपयोग केला जातो. बलान्तीन बैला खजुराची खीर करून दिली जाते. तसेच पौष्टिक म्हणून खारीक व खजुराचा उपयोग केला जातो. देवपूजेसाठी सुद्धा खजुराचा उपयोग केला जातो.

इतर माहिती :-
   खजुराचे उत्पादन हे पश्चिम आशिया आणि भूमध्य सागरी प्रदेशात भरपूर प्रमाणात आढळते. भारतात प्रामुख्याने हिलावी, खुदाची, जाहिदी या जातीचे खजूर आढळतात.

1 टिप्पणी: