पपई
आपल्या परिसरात आढळनारे आणखी एक फळझाड म्हणजे पपई होय. पपई हे फळ सर्वांनाच
आवडते.
वर्णन- पपईची झाडे साधारणपणे आठ ते दहा फुट उंच वाढतात. याचे खोड सरळ वाढते.खोडाचा
रंग पिवळसर पांढरा असतो. हे झाड भरभर वाढते. याची पाने हिरव्या रंगाची असून
छत्रीसारखी चारी बाजूला पसरलेली असतात. पानांना लांब देठ असते. हे देठ पिवळट
पांढऱ्या रंगाचे असते. झाडाच्या खोडाच्या वरच्या बाजूला फळे लागतात. फळे कच्ची
असतांना हिरवी व पिकल्यावर त्याचा रंग पिवळा होतो. आतील गर पिवळसर नारिंगी रंगाचा
असतो. या फळाच्या आतमध्ये बिया असतात. त्यांचा रंग काळा असतो.


वैशिष्ट्य- पपईच्या झाडांना फांद्या नसतात. खोडालाच लांब देठ असलेली पाने येतात. या
पानांच्या कडेने नक्षी असते.
ओंषधी उपयोग- अन्नपचनासाठी पपई खावी. पित्तनाशक म्हणून या फळाचा उपयोग केला जातो. गाजकार्नावर
तसेच कातडीच्या रोगांवर क्च्च्या पपईचा चिक लावावा. टी.बी., दमा, खोकला तसेच
पोटाच्या अनेक विकारावर पपई गुणकारी आहे. कच्च्या फळाची भाजी खाल्ल्याने यकृत
विकार बरे होतात. पपईच्या सेवनाने शरीरातील कल्शीअम कमतरता भरून निघते.
इतर माहिती- पपई हे फळ अतिउष्ण आहे. गर्भवती स्रियांनी पपई खाऊ नये. कच्च्या पपईची भाजी
करतात. पिकलेली पपई चवीला गोड, रुचकर असते. बहुतेक शेतकरी पपईच्या बागा करतात.
पपईला बाजारपेठेत भरपूर मागणी असल्यामुळे शेतकर्यांचे चांगले अर्थंजन होते. हल्ली
पपईची झाडे दारातसुद्धा लावली जातात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा