बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

डाळिंब

                                                                     डाळिंब  


     आपल्या निसर्गात औषधी फळझाडे पुष्कळ आहेत. त्यापैकी डाळिंब हे एक औषधी फळ आहे.


वर्णन:-
    दालीम्बाच्या झाडाची उंची साधारणपणे बारा ते पंधरा फुट असते. याचे खोड धुरकट तांबड्या रंगाचे असते. या झाडाच्या फांद्यावर काटे असतात. या झाडाची फुले लाल रंगाची असतात. फळे गोल असतात. फळाला वरून साल असते. आतमध्ये अनेक पापुद्रे असतात. त्यात असंख्य दाने असतात. ते दाने लाल किंवा गुलाबी रंगाची असतात.

प्रकार:-
    डाळिंबा रसानुसार डाळिंब गोड, आंबट, गोड किंवा आंबट असे तीन प्रकार पडतात.



जाती:-
    व्यवहारात डाळींब फळाच्या दोन जाती प्रसिद्ध आहे. पांढर्या रंगाची मस्कती डाळिंबे व ‘बेदाणा’ जातीची काबुली डाळिंब ह्या जाती प्रसिद्ध आहे.
औषधी उपयोग
डाळींब फळाच्या फुले, मुल, फालान्वरील साल यांचा उपयोग औषध म्हणून केला जातो. डाळिंबाचे  रुचिवर्धक, भूक वाढवणारे आहे. लहान मुलांना अतिसार झाला असेल तर कोवळ्या फुलांचे चूर्ण शेळीच्या धुतात द्यावे. शक्ती वाढवण्यासाठी, उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी डाळींब फळाचा रस उपयोगी पडतो. खोकला झाला असेल तर डाळिंब फलाच रस उपयोगी पडतो. या फळाच्या सालीचे चूर्ण कफनाशक आहे. दम्यावर डाळिंब उपयोगी पडते. नाकातून रक्तस्राव होत असल्यास सालीचे चूर्ण उपयोगी पडते. डाळिंब फळाच्या रसात खडीसाखर घालून प्यायल्याने पित्त कमी होते.
    या झाडापासून दाडिमाष्टक चूर्ण, दाडीमदिघृत तसेच डाळिंब तेलही बनवता येते.
इतर माहिती
      बारा महिने येणाऱ्या या फळाच्या सातच्या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या विशेष फायदा होतो. असे हे बहुगुणी डाळिंब  घरासमोर लावतात.



         




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा