नारळ
आपल्या घरासमोर दारात वाढणारा, सर्वाना परिचित असणारा असा वृक्ष म्हणजे नारळ
होय. नारळ हे फळ सर्वाना आवडते.
जाती- सिंगापूरी
वर्णन- नारळाची झाडे सर्वसाधारणपणे ५० ते ६० फुट उंच असतात. नारळाच्या जातीवर
झाडांची उंची अवलंबून असते. सिंगापुरी जातीच्या नारळाचे झाड उंचीने कमी असते;
परंतु फलधारणा लवकर होते. काही नारळाच्या झाडांना दहा वर्षांनी फलधारणा होते. हे
झाड सरळ व उंच वाढते.
नारळाच्या पानांना झावळ्या म्हणतात. पाने हिरव्या रंगाची असतात. एका लांब टणक
दांड्याच्या दोन्ही बाजुनी लांब लांब पात्या असतात. टणक दांड्याला हिर्कुत
म्हणतात.
या झाडांना प्रथम बारीक फुले येवून नंतर फलधारणा होते. हि फुले झुप्क्याने
येतात. हि फळे घडांनी येतात. हेच नारळ होत. कच्चे फळ हिरवे असते. तयार झाल्यावर
त्याला तपकिरी पंधारात रंग येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा