बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

फणस

                   फणस

       ज्या झाडांची फळे बाहेरून काटेरी आणि आत मधुर गरे असतात. ते म्हणजे फसण होय.

जाती- फणसाच्या कापा आणि बरका अशा दोन जाती आहेत.

वर्णन- कोकण आणि गोवा येथे फणसाची पुष्कळ झाडे आहेत. हे झाड साधारणपणे पंचेचाळीस  ते पन्नास फुट उंच व सरळ वाढते. त्याला अनेक फांद्या फुटतात. याची पाने हिरवी, जाड व लंबगोल असतात.
फणसाच्या खोडालाच फळे येतात. या फळांचा आकार साधरणपणे शहाळया (असोल्या नारळ) एवढा असतो. या फळावरील काट्यांच्या आकारावरून जाणकार लोक तो फणस कोणत्या जातीचा आहे. हे ओळखतात. काही फळे खूप मोठी म्हणजे वजनदार असतात. या फळांचा मोसम पौश महिन्यापासून ज्येष्ट-आषाढापासून असतो.

ओंषधी उपयोग- मोडशी या रोगांवर फणसाच्या झाडाची साल उगाळून देतात. हगवण, सूज येणे, कंठरोगांवर फणसाचा उपयोग होतो.

        

इतर उपयोग- फणस पिकल्यावर त्यांचा सुवास सर्वत्र पसरतो. फोडून आतील गरे खाण्यासाठी वापरतात. फणस पिकून मऊ झाल्यावर आतील गरे काढतात. या गर्यापासून पोळ्या, गऱ्याट तांदळाची कणी मिसळून सांडण करतात. क्च्च्या फणसाचे गरे बारीक चिरून, खोबर्याच्या तेलात तळून त्याला तिखट, मीठ लावतात. हे खाण्यास कुरकुरीत व चविष्ठ लागतात. काही ठिकाणी याच्या गर्यापासून आईस्क्रीम बनवतात.


फणसाच्या आतील बिला आठली म्हणतात. या आठल्या  भाजून तसेच मीठ घालून उकळून खातात किंवा आठ्ल्यांची भाजी करतात.
फणसाची टरफले (चारखंड) गाई-म्हशीना खायला देतात; त्यामुळे त्या भरपूर दुध देतात, याचे लाकूड टिकाऊ असते. घरे बांधण्यासाठी, फर्निचर, होड्या इ. साठी याचा उपयोग करतात.

याला पोषक असे उष्ण व दमट हवामान, तसेच तांबडी माती कोकण व गोवा येथे असल्याने त्तेठेच हि फळे मोठ्या प्रमाणावर येतात. 

                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा